Monday, October 29, 2012

शालार्थ : पायरी- 4 (Step - 4) (EMPLOYEE DETAILS )


 शालार्थ : पायरी- 4
(Step : 4)
(EMPLOYEE DETAILS )


 • या पायरीमध्ये प्रत्येक EMPLOYEE ची 
१) EMPLOYEE PERSONAL  DETAIL  
२) OFFICE DETAILS 
३) BANK /DCPS /GPF DETAILS  
४) GIS DETAILS  
५) NOMINEE DETAILS  
६) PHOTO & SIGN DETAIL 
माहिती भरावयाची आहे. 
---------------------------------------------------------------------------------
पूर्वतयारी :

 • शाळेमधील सर्व EMPLOYEE चे PHOTO आणि SIGNATURE चे नमुने .jpeg किंवा .bmp FORMAT मध्ये SCAN करून DESKTOP वर SCAN फोल्डर मध्ये ठेवावे. 
 • Scan केलेल्या File ला save करताना agrephoto.jpeg agresign.jpeg या पद्धतीने save करावेत जेणेकरून नंतर upload करताना सोपे होइल. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 •   WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE CONF. FORM FOR SHALARTH > NEW FORM हा OPTION निवडावा.  • यानंतर वरील  छोटी WINDOW OPEN होईल. या मध्ये एक प्रश्न विचारला जाईल. त्याचे उत्तर "NO" निवडावे .तरच EMPLOYEE DETAIL संबंधी WINDOW OPEN होईल .
 •  NO निवडल्यानंतर खालील WINDOW  ओपेन होईल.
टीप :
 •   या WINDOW मध्ये आडवे वरती ६ TAB दिले आहेत.त्या प्रत्येक TAB मध्ये माहिती भरावयाची आहे.  ती माहिती भरून झाली तरच  खालील  "FORWARD TO DDO" हा पर्याय  निवडा. प्रत्येक  TAB  भरून झाल्यावर तो निवडू नका. सगळे भरून झाल्यावरच निवडा ; नाहीतर माहिती ACCEPT  करत नाही.
 • तसेच सर्व ६ TAB ची माहिती एकाच वेळी आपल्याकडे नसल्यास जेवढी माहिती आपण भरली आहे ती " SAVE AS DRAFT " निवडून SAVE करून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेस  ती माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. जेवढी  माहिती अपूर्ण असेल तीच भरावी लागेल.


 • (  DRAFT मधील FORM खालील PATH ने पाहता येतील  WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE FORM FOR SHALARTH > VIEW DRAFT FORMS आणि पुन्हा edit करता येतील.)
 • अ)   EMPLOYEE DETAILS : OPEN  झालेल्या WINDOW मधील पहिला TAB EMPLOYEE PERSONAL  DETAIL हा आहे.तो BY DEFAULT निवडलेला असतो. तो खालील WINDOW मध्ये दाखवला आहे.


 (माहिती साठी दोन WINDOW मध्ये तोTAB OPEN केलेला आहे . प्रत्यक्षात तो एकाच WINDOW मध्ये दिसेल.)
 •  यामध्ये आपल्याला UID (UNIQUE IDENTIFICATION NUMBER / आधार कार्ड NO ) भरावयाचा आहे.तो नसेल तर  EID (ENROLMENT  ID ) भरावयाचा आहे. हा २८ अंकी NO. आधारच्या पावतीवरून मिळेल त्या पावती विषयी माहिती खाली चित्रात दिली आहे.


 • तसेच यामध्ये आपले पूर्ण नाव मराठी , ENGLISH  मध्ये भरावयाचे आहे. त्या सोबत POSTAL ADDRESS भरावयाचा आहे. आपली वैयक्तिक विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी.
 • देवनागरी मध्ये नाव लिहिण्यासाठी खालील link वापरा. 
 • Qualification दोन प्रकारे म्हणजे PRIMARY आणि SECONDARY भरावयाचे आहे. 
 • हि सर्व माहिती भरून झाल्यानंतर वरील पुढचा  TAB निवडा.. 
---------------------------------------------------------------------------------
 • ब) OFFICE  DETAILS :   
आता वरील TAB मधील दुसरा TAB निवडा.. त्यामध्ये OFFICE DETAILS द्यावयाचे आहेत.
एकच TAB आहे परंतु माहिती साठी २ WINDOW मध्ये OPEN  केला आहे.
 •  या TAB मध्ये आपले DEPARTMENT BY DEFAULT दिलेले आहे. त्या खाली CADRE (आपला क्लास C /क्लास D )भरावयाचा आहे. 
 • DATE OF JOINING ,PAY COMMISSION ,DESIGNATION (पदनाम) , PAY  SCALE , BASIC PAY ,CURRENT POST यांची माहिती भरावयाची आहे.
 • शिक्षणसेवकासाठी 6TH PAY COMMISSION न निवडता CONSOLIDATED PAY हा पर्याय निवडावा .कारण त्यांना FIX मानधन आहे. 
 • POST आणि DESIGNATION मध्ये फरक आहे. जसे, ASST. TEACHER हे DESIGNATION आहे पण तोच शिक्षक जर IN-CHARGE असेल तर ती त्याची POST असेल.
 • PAY  SCALE, PAY IN PAY BAND (ग्रेड पे सोडून) ,भरायचा आहे. मग BASIC PAY आपोआप तयार होईल.
 • CURRENT POST यांची माहिती भरावयाची आहे. DESIGNATION व CURRENT POST एकच आहे. निवडल्यानंतर CURRENT INSTITUTE, INSTITUTION ADDRESS / PHONE NO आपोआप येतील..
 • NAME OF POST AT FIRST APPOINTMENT मध्ये नोकरीला प्रथम काय म्हणून लागलो होतो ,ती POST लिहावी.
 • DATE OF JOINING CURRENT POST IN CURRENT INSTITUTE मध्ये त्या POST वर  सध्याच्या शाळेत आल्याची दिनांक लिहायची आहे.
 •  INDIVIDUAL APPROVAL ORDER NO आणि APPROVAL DATE NO. भरावयाचा तो आपल्या पहिल्या Joining चा आहे.
---------------------------------------------------------------------------------
 • BANK /DCPS (DEFINED CONTRIBUTION PENSION SCHEME ) /GPF (GENERAL PROVIDENT FUND /सामान्य  भविष्य निधी ) DETAILS 
OFFICE DETAILS चा TAB भरून झाल्यानंतर पुढचा BANK/DCPS /GPF DETAILS चा TAB निवडावा.
 •  या TAB मध्ये आपल्या स्वत:च्या BANK DETAILS ची माहिती भरावयाची आहे. BRANCH NAME निवडले की IFSC Code आपोआप येतो. 
 • तसेच DCPS DETAILS  द्यावयाचे आहेत. DCPS ही PENSION SCHEME  NOV.२००५ पूर्वी नोकरीला लागलेल्यांसाठी आहे. परंतु सध्या ही योजना महानगरपालिकांसाठी लागू नाही. 
 • त्यामुळे DCPS ला  NO असे सर्व कर्मचाऱ्यांना लिहायचे आहे. तसेच १/११/२००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनी PF मध्ये NOT APPLICABLE असे निवडावे. बाकीच्यांनी PF ची माहिती द्यावी. 
 • PF DETAILS देताना A /C MAINTAINED BY DEPARTMENT असे निवडावे. ,ACCOUNT NO.,SERIES DESCRIP.भरावयाचे  आहे.SERIES NO महापालीकेना नसतो.
---------------------------------------------------------------------------------
 • GIS (GROUP INSURANCE SCHEME /सामूहिक विमा योजना )DETAILS : 
BANK DETAILS भरून झाल्यानतर पुढील GIS चा TAB  निवडावा. 
  • GROUP INSURANCE SCHEME जिल्हा परिषदेमध्ये असते. त्यांनी आपण या SCHEME मध्ये केंव्हा पासून आहोत ती MEMBERSHIP DATE लिहावयाची आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये ती लागू नाही. तेंव्हा N.A. OPTION निवडावा. 
  ---------------------------------------------------------------------------------
  • NOMINEE (वारसदार म्हणून नामांकित केलेला व्यक्ती)  DETAILS :
  GIS च्या TAB पुढील TAB NOMINEE निवडावा.
   

  पाहिजे तेवढे NOMINEE आपण देवू शकतो.. माहिती भरली कि ADD "वर CLICK करावे.मग ते नाव खाली चौकोनात येईल. पुन्हा वरील FORM मोकळा होईल ;तिथे आपण पुढचा  NOMINEE देवू शकतो.


  •  ज्यांना आपल्या खात्याचा वारसदार म्हणून निवडायचे आहे त्याची माहिती व त्याचे खात्यातील % इथे भरावयाचे आहे. पत्ता ,जन्मतारीख ,नाते ही  माहितीही भरवायची आहे. 
  • एकापेक्षा अनेकांना NOMINEE म्हणून ADD करता येते.(जसे, मला माझ्या पत्नीला २५% ,आईला २५% ,मुलाला ३५% , वडिलांना १५% असे विभाजन करावयाचे असेल तरी ते करता येते.त्यासाठी प्रथम एकाची माहिती भरावी ;त्याला किती % द्यावयाचे आहे ते लिहावे आणि नंतर खालील "ADD" BUTTON दाबावे. मग पुढच्या NOMINEE ची माहिती भरावी. असे कितीही NOMINEE आपण ADD करू शकतो .)
  ---------------------------------------------------------------------------------
  • PHOTO / SIGN :
  सर्वात शेवटची PHOTO/SIGN हि TAB निवडावी.
  •  इथे प्रत्येकाला आपला स्वता:चा PHOTO आणि SIGN UPLOAD करायची आहे. 
  • UPLOAD करावा लागणारा PHOTO / SIGN  SCAN करून किंवा MOBILE मध्ये CAMERA च्या सहायाने काढून शक्यतो .jpeg format मध्ये कॉम्पुटर मध्ये घ्यावा/घ्यावी. TAB  मधील BROWSE BUTTON निवडून कॉम्पुटर मध्ये तो फोटो/सही कुठे आहे तो पत्ता निवडून UPLOAD FILE हा पर्याय निवडावा. ती सही/फोटो शालार्थ प्रणाली मध्ये उपलब्ध होईल. 
  अश्या  प्रकारे प्रत्येक कर्मचारी प्रणालीमध्ये नोंदवायचा आहे.

  No comments:

  Post a Comment